तुझं माझं प्रेम शब्दात रेखाटू कसे, फुलाचा सुगंध जसा कैद करून ठेवू कसे. तुझे माझे प्रेम असे ज्यास कसली उपमा नसे, शब्दच मिळेना त्यास,शब्दात रेखाटू कसे.? सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.