मिलन हा आहे अबोला तुझा की आली आहेस लाडात मनात काय गुपित लपलय सांग माझा कानात सोडना राणी रुसवा आता बघ काजवे तुला चिडवतात फुलासाठी कशी फुगून बसते अशी थट्टाही उडवतात फुलच काय प्रिये अग मी चंद्रलाही तोडून अनेल पण येणारी मुलगी आपली मामा कोणाला म्हणेल खिडकी मधल्या गुलाबाच्या कळ्या रोज तुला पाहतात अन् जळून जळून सौंदर्यावर तूझ्या लालभडक होतात रूसल्यावर खूप गोड दिसतेस हे माहीत आहे का तुला मग चिमटा घेऊन रडवाव तुला अशी इच्छा होते मला हळूच कुशीत शिरता तू थंडक मनाला भासते अन् सारे रंग फिके पडतात जेव्हा तू हसते खूप झाला अबोला आता बघ फुलांनी सजवली बाज आयुष्य फक्त तुझ्याचसाठी हे वचन देतो मी आज #Love #firstnight