Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम ★★★★★★★★★★★★ खरच

 प्रेम

★★★★★★★★★★★★
 
                         खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु  ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम. 
                         नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तुमच्या किती सोबत राहतील याची शाश्वती कोणीच नाही देवू शकत पण आई-वडील हे कायम त्यांचा श्वास असे पर्यंत ते तुमच्या पाठीशी राहतात जरी मुलगा/मुलगी त्यांचा मोठे होऊन तिरस्कार करत असो पण तिळ मात्र ही प्रेम कमी न होऊ देणारे फक्त आई-वडीलच. 
                         आता जरा तरून म्हणजे माझ्यासारख्यांच्या प्रेमाच्या गंमती जंमती कडे. खरं तर प्रेमाची सुरूवात ही मैत्री पासुन सुरू होते मग ती पुढे पुढे चालतच जाते एक रंगमय वाटेवर स्वप्नांच्या दुनियेत रंगबेरंगी चित्रांचे वास्तविकीकरण करत. कॉलेज मध्ये तर याची खरी अनुभूती येते.आधी प्रेमात प्रेम पत्र लिहली जायची तो काळ ही एक वेगळाच म्हणायचा पण रोमांचित ही मग हळु हळु ती जागा गुफे, ग्रिटींग, भेट वस्तु यांनी घेतली. मग जगासोबत प्रेम ही प्रगत होत गेलं व होता होता काळ इथं येवुन पोहचला. साधन बदलले पण प्रेम तेच पध्दत बदलली पण भावना मात्र तेच. 
                          आताचं प्रेम खुपच प्रगत व्हर्चुअल तर्हेने मैत्री व त्यातुन प्रेम म्हणजे फेसबुक, वॉटस्अॅप या सहाय्याने खुप लवकर विचार जुळले की तितकीच घट्ट मैत्री मग काही दिवसात तेच एक प्रेमी युगल बनतात. काहींच यशस्वी तर काहींचा ब्रेकअप होतं. कारण ही तशीच मला रिप्ले लवकर नाही दिलास, कॉलच बिझी आला असे अनेक व त्यातुन जोडीदारावर वाढती संशयीवृत्ती व कमकुवत होणारा विश्वास. मग होतो एक दिवस अंत.