हा, मी भिमाचा पँथर ! आदी मी, बाकीचे नंतर..! मी काळा स्वातंत्र्य दिवस, मी निवडणुकीचा बहिष्कार, मी काळा प्रजासत्ताक दिन, मी गीता दहनाचा अंधकार..! मी घमंडी पाटलाचा वैरी, मी पँथर ची एक पायरी, मी अन्यायविरुद्ध आवाज, मी न्याय देण्याची डायरी..! मी बाबासाहेबांचे साहीत्य, मी दलित जनता तमाम, मी दुश्मन हात-सेनेचा, मी भिमाकोरेगाव चा सलाम..! मी भिमाचा अभ्यासु, मी गवई बंधुंचे आस, मी लव्हात्रे नी आठवले, मी दलितांचा विश्वास..! मी विद्रोही नामदेव, मी पवारांचा जया, मी ढाले आणि महातेकर, मीच संगारेंचा भाया..! मी न्याय अन्यायातील अंतर, मी विद्यापीठाचे नामांतर.. म्हणुनच म्हणलं मी पँथर.. आदी मी बाकीचे नंतर..! -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर #Dalit_panther #Jay_Bhim