वाढदिवस मला झाला आनंद आज या क्षणी, वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. सकाळी लवकर झोपेतून उठलो, एक वर्ष निघून गेलं खूप बरं वाटलं. रात्री मित्र माझ्या घरी आले, म्हणाले उठ मला 12 आता झाले. काय चाललंय, काय होतंय, कळतंच नव्हत मनी? वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. मित्रांनी आणला कॅन्डल आणि केक, गिफ्ट दिला प्रत्यकाने मला एक एक. सुरू झाली दंगामस्ती सुरू झाली गाणी, वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. काका- काकी, मामा -मावशी माझ्या घरी आले, खूप वर्ष जग बोलून ते निघून गेले. आई म्हणाली मोठा होऊन बन तु ज्ञानी, वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. मोबाईलवर मिळत होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणत होते पुर्ण होऊदे तुझ्या इच्छा. कोणी म्हणाले बन धनी, कुणी म्हणाले गुणी, वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. वाढदिवस होता माझ्यासाठी सण, खूप चांगलं मिळालं या दिवशी जेवण. अशी होती मित्रांनो वाढदिवसाची कहाणी, वाढदिवस आला माझा या शुभ दिनी. ©Harsh #BirthDay #Happy_Birthday #Janmdin #vadhdivas #day