असावं असं कुणीतरी आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं.. इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं.. मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं.. कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार... आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं.. मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं... आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं, दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं... खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी