कोरोना की तु ? विरहाच्या आगीत ढकलून चाललीस प्रिये जातांना एक काम कर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे कमी कर पहा प्रत्येक पावलावर माझ्या आठवणींचा संसर्ग होईल जरा तुझ्या मनाला आवर माझे स्पर्श झालेल्या हाताला संयमाचे सॅनिटायझर वापर कधी मिसळले होते श्वासामध्ये श्वास नाकाला तु तुझ्या माझ्या विसरण्याचा मास्क धर माझ्या हृदयातून निघणारे धगधगते विषाणू तुझ्या श्वासात मिसळू नको कारण, माझ्या नसा नसात तुझ्या सहवासाचा कोरोना आहे पण एक नक्की आहे कोरोनाशी लढण्याला मी समर्थ आहे पण तुझा सामना करण्यास मी असमर्थ आहे ! बाळा✍️ ( बाळासाहेब साळवे. ) बाप 😍 वडिलांचे शब्द 😍🙌✍️ #मराठी #कविता #असाचकाहीतरीमनातला