Nojoto: Largest Storytelling Platform

*पानगळ ही सरली* *नवा बहर तो आला* *पालवींची नक्

*पानगळ ही सरली* 
 *नवा बहर तो आला* 
 *पालवींची नक्षी ओली* 
 *साज शृंगारून शेला* 
          *तरुलतेवर पर्ण* 
          *तेजदीप उजळले*
           *इंद्रधनु कुंचल्याचें*
            *सप्तरंग उधळले*
 *नवचैतन्याने सारी* 
 *शहारून सृष्टी गेली* 
 *थरथर जाणीवेची* 
 *अंतराचे फुल वेली* 
        **कात टाकते अवनी* 
            *मखमली हिरवळ** 
        *गजभार सुमनांचा** 
             *दाटलांसें परिमळ** 
 *मनां पालवी फुटली* 
 *आशेचे कोंब रुजले* 
 *नक्षत्रांच्या मांगल्याचे* 
 *दारी तोरणं सजले*

©Shankar kamble #पानगळ 
#बहर 
#पालवी 
#सृष्टी 
#निसर्ग_सौंदर्य 
#निसर्गप्रेमी 
#झाडं 
#वेली
*पानगळ ही सरली* 
 *नवा बहर तो आला* 
 *पालवींची नक्षी ओली* 
 *साज शृंगारून शेला* 
          *तरुलतेवर पर्ण* 
          *तेजदीप उजळले*
           *इंद्रधनु कुंचल्याचें*
            *सप्तरंग उधळले*
 *नवचैतन्याने सारी* 
 *शहारून सृष्टी गेली* 
 *थरथर जाणीवेची* 
 *अंतराचे फुल वेली* 
        **कात टाकते अवनी* 
            *मखमली हिरवळ** 
        *गजभार सुमनांचा** 
             *दाटलांसें परिमळ** 
 *मनां पालवी फुटली* 
 *आशेचे कोंब रुजले* 
 *नक्षत्रांच्या मांगल्याचे* 
 *दारी तोरणं सजले*

©Shankar kamble #पानगळ 
#बहर 
#पालवी 
#सृष्टी 
#निसर्ग_सौंदर्य 
#निसर्गप्रेमी 
#झाडं 
#वेली