❤ इवले इवले हात तुझे इवली मोट्ठी मीठी बोबडं बोबडं बोलून बाळा सांगतो गोष्टी किती इवल्या इवल्या ओठांची गोडगोड पापी तुझ्यासोबत हसतखेळत बाळा मी बहुरूपी इवल्या इवल्या बोटांनी गालगुच्चे घेशी झोपायला तुला हवी हातांची उशी अन मऊमऊ कुशी इवल्या इवल्या नाकावर लाललाल राग काय हवंय बाळा तुला हट्ट करूनच माग इवले इवले डोळे तुझे फारफार बोलके तू खांद्यांवर असताना जबाबदारीचे ओझे भासे हलके ❤ #rayofhope #happychildren's_day #innocence #kidslove❤