* शेवटचे वर्ष ,विद्यार्थी ,परीक्षा आणि राजकारण * विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षा विषयी प्रश्नांचा गुंता| आज नाही, उद्या निर्णय होणार मंत्री सांगता || परीक्षेची पद्धत कशी असणार तेव्हा सापडेल अभ्यासाची वाट | विद्यार्थी तेव्हाच तर चढू शकतात यशाचा घाट || परीक्षेबाबत विद्यार्थ्यांची रोजचं घालमेल आहे | परीक्षेची निर्णय घेणारे रोजच निरोत्तर आहे|| परीक्षेवर देखील किती दिवस चालले राजकारण | निर्दोष विद्यार्थ्यांचे अपेक्षांचे होते रोजचेच मरण|| कधी सुटणार आहे परीक्षेचे निर्णयाचा कोड कळतच नाही| विद्यार्थ्यांचे मन कधी मंत्र्यांना कळेल हेच समजत नाही|| लेखणी तुला सांगते शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची कथा| तूच समजून घेशील त्यांचा मनाची व्यथा|| -✍️Shital K. Gujar✍️ 🙏😊नमस्कार, प्रस्तुत कविता ' शेवटचे वर्ष, विद्यार्थी ,परीक्षा आणि राजकारण' या विषयावर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची व्यथा काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे . 🙏✍️ 👉 मैत्रिणी सांगितले आमची व्यथा काव्यातून लिहून दे तिच्या आग्रहसाठीमुळे मी हे लिहिलं आहे. 👉सूचना - कवितेत कुठल्या ही आदरणीय मंत्रीचा नावाचा उल्लेख नाही. म्हणून कविता कोणाला उद्देशून लिहलेली नाही.🙏 #शिक्षण #परीक्षा