माझा शेतकरी बाप बाप माझा राबतो शेतात अभिमान आम्हा वाटतो जगाचा पोशिंदा म्हणून मान ताठ आमचीही करतो घाम गाळून धरणी मायेस सिंचन रक्तपाण्याने घालतो कष्ट त्याचा धर्मच जणू तो नित्यनेमाने माय पुजतो अन्नकणाचे महत्त्व जाणून भुकेसाठी ऊत्तर शोधतो वीतभर पोटासाठीच नाही आत्म्यापासून शेतात कष्टतो आभाळभर पाऊस त्याच्या नेत्रातूनही सांडत असतो विठूमाऊलीस वारंवार पाऊस साकडे घालून तोच मागतो हळव्या मनाचा बाप माझा शेतात योद्धा म्हणून लढतो पिक सोनसळी पाहून तो धन्य ह्रदयापासून होतो सौ.शितल हर्षल संखे ता.जि.पालघर ©Shital Sankhe #शेतकरी_दिवस