#प्रेमकविता तुझ्या आठवणींचा ठेवा अजूनही ह्रुदयात जपला आहे तू जरी निभावलं नाहीस नातं पण मी मात्र हळुवार जपलं आहे डोळे बंद होता तुझेच प्रतिबिंब तरळत आहे तुझ्या त्या प्रेमाची आठवण अलगद स्पर्शून जात आहे गुन्हा एवढाच माझा सख्या जिवापाड प्रेम केले तुझ्यावर जाणीव नव्हती मज तुझे नव्हते प्रेम माझ्यावर तू गेलास मला एकटीला अर्ध्यावर सोडून काय करू मी आता तुझ्यावर रुसून शेवटी एवढेच सांगेल प्राणपिया तू नसलास सोबत जरी या पृथ्वी तलावर तुझ्या आठवणीचा तलाव सजवेल आयुष्यभर माथ्यावर. ©Kalpana Sawale #प्रेम #लव्ह #वाट