कवी ही जात माझी कविता हा धर्म आहे, शब्दांचे अमृत हेच जगण्याचे मर्म आहे..१ नसानसात वाहतो भावनांचा गहिवर, शब्दातून उमटतो कधी अव्यक्तसा कहर..२ जाती धर्म पाहून का भावना कल्लोळतात, असा कोणता झेंडा आहे ज्यांना भावना कळतात..३ सारेच रंग तर कवितेत मग काव्यधर्मच पाळावा, सुंदर सुगंधी शब्द योजून शब्दसुमनी गजरा माळावा..४ प्रत्येक मनामनात मग फक्त स्नेह अंकुरेल, तरल अश्या अनुभूतींनी सारंच जग हसेल-बहरेल..५ रोहिणी पांडे ९/१०/१९ #रोही#