मनाचं व्रत कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास. मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं. खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल. आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची. मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करून बघा. प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!! #मनाचं व्रत