#माणसांच्या गर्दीत हरवलेलं माझं मन.... मन हरवलंय माझं ह्या माणसांच्या गर्दीत तुडुंब भरलंय अन् रितं देखील होईना पावसाच्या सरीत भ्यायला लागलंय फारच पडणाऱ्या प्रश्नांच्या सर्व कोड्यांना नकोतंच कुठल्या भावना म्हणतंय रामरगाड्याला तोडावेसे वाटतात पाश अन् व्हावेसे वाटते मोकळे पण मग येतात बंधने अन् पुन्हा मातीमोल होते सगळे सतत होणाऱ्या चिखलफेकीत मन मात्र बावरलंय कुणास म्हणावे अपुले हे आजवर कधी ना उमगलंय सहजच असे काही घडतंच नाही सगळंच क्लिष्ट भरकटलंय सारं हे ठरवलेलं कोण जाणे आहे कुणाचं अन् आयुष्याला कुणाची लागली दृष्ट हरवलंय मन माझं अबोल झालंय फार नात्यांच्या गुंत्यात गुंतत जातंय सतत सापडेना त्यास कुठलीच किनार.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #शापीत_हे_मन_माझं