Nojoto: Largest Storytelling Platform

नवरा जर नसेल तर.. नवरा नसेल तर राजवाडा सुद्धा सुन

नवरा जर नसेल तर..

नवरा नसेल तर राजवाडा सुद्धा सुना अन् रिता आहे
नवऱ्याला सतत कमी लेखणे हा अक्षम्य गुन्हा आहे 
खरं पाहीलं तर त्याच्याशिवाय बायकोच्या
अस्तित्वातले कुठलेच पान हलत नाही 
घरातलं कोणतंच सुख नवऱ्या शिवाय बायकोला खरं अस्तित्व देत नाही
नोकरी अन् पगाराशिवाय त्याच्याकडे असतं तरी काय
असं म्हणणाऱ्यांना आता सांगावे,बोलावे तरी कसे अन् काय
स्वच्छ पवित्र घरंच मुळी नवऱ्यानं घेतलेलं असतं
मात्र अतिशय विक्षिप्त विचित्र माणूस म्हणून 
त्याचंच सौंदर्य त्याला हसत असतं
पगार मर्यादित असताना सुद्धा सर्वांचे लाड त्यात त्यास पुरवायचे असते
म्हणूनच नवऱ्याचे वय हे बायको पेक्षा जास्तच असते
त्याचा दोष काय तर म्हणे काटकसर करायला लावतो
घरपरिवारासाठी बिचारा मात्र रात्रंदिवस सतत राबतो
 चिडत असेल रागवत असेलही अधुनमधुन
भांडतही असेल सहनशिलता संपल्यावर
तुम्हीच सांगा काय होणार त्याचं हे असं
घरचे दारचे टोमणेच सतत ऐकत असल्यावर
नवऱ्याची टिंगल उडवुन सतत त्याच्यावर हसु नका
त्याला सदा कमी लेखुन पट्टराणीचे स्थान गमवु नका
नवरा म्हणजे अंगणामागचा भरभक्कम चिरेबंदी
आखीवरेखीव भारदस्त वाडा अन्
बायको म्हणजे त्या वाड्यात ठेवलेला पवित्र प्रेमाचा अमृतघडा
नवरा म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुमागचं आभाळ
सौंदर्य खुलवणाऱ्या कुंकवामागचं भव्य दिव्य उदार भाळ
बायको मॕडम कधीतरी जरा नवऱ्याकडेही पहा
त्याचं मन जाणण्यासाठी जरा समजुन उमजुन रहा
कधीतरी चारचौघात अन् एकट्यात
त्याचंही मनभरून कौतुक करावं
त्याच्या अबोल दुःखाचं एकतरी गीत लिहावं
कधी उगाचंच त्यालाही अलवार जवळ घ्यावं
त्याच्याही मनात जे सलतंय ते त्याच्या
मौनातुनच समजुन घ्यावं
आयुष्याची ही सप्तपदी जरी ठरते तप्तपदी
ती सुद्धा मग हसतहसत त्याच्या बरोबरीने चलावी
प्रत्येकीनं स्वतःची अशीही आगळीवेगळी लवस्टोरी खुलवावी अन्
ती पुढच्या पिढीसाठी इतिहास म्हणून जगवून त्यातुन एकस्वरूप,त्याग
या भावनांची व्याख्या नव्यानं सर्वांसमोर मांडावी

©शब्दवेडा किशोर #नवराबायको