Nojoto: Largest Storytelling Platform

खरंच स्वातंत्र्य आहे का ?? (कॅप्शन मधले वाचावे) स्

खरंच स्वातंत्र्य आहे का ??
(कॅप्शन मधले वाचावे) स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत.. खरंच स्वातंत्र्य आहे का ??
#स्वातंत्र्याची७५वर्षे
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. सर्वांनाच माहिती आहे,मात्र पुढील तीन वर्षे म्हणजेच 1950 पर्यंत स्वातंत्र्य असूनही भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते.भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला 30 जानेवारी 1950 या दिवशी.जेव्हा भारताचा स्वतःचा संविधान लागू झाला आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक देश झाला. ब्रिटिशांनी जेव्हा भारत देश सोडून जाण्याचे जाहीर केले,तेव्हा त्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी नऊ महिने अगोदरच भारत सोडण्याचा निर्णय घेतला,त्याला कारण होते भारतीय जाती हिंसा.
आज जेव्हा आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे झालीत तरी अजूनही आपल्या देशात जातीय हिंसा काही कमी झालेल्या नाहीत.तेव्हा भारतीय जाती हिंसेला कंटाळून ब्रिटिश निघून गेले, पण आत्ताचे राजकारणी म्हणा किंवा इतर कुठलाही दंगली घडून आणणाऱ्या संघटना म्हणा ह्या जातीय हिंसेचा स्वतःच्या फायद्यासाठी पुरेपूर वापर करून घेत आहेत.आणि आपण स्वातंत्र्य भारत देशाचे स्वातंत्र्य नागरिक असूनही आजही गुलामगिरीत जगत आहोत.
ब्रिटिशांचे गुलाम होतो आपण पहिले आणि आता आपल्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम,तेव्हा जेव्हा देश स्वातंत्र्य नव्हता कित्येक संघटना कार्यरत होत्या पण त्या देशाला स्वातंत्र्य कसे देता येईल यासाठी झटत होत्या आणि आताच्या संघटना किंवा पक्ष हे देशाला कशाप्रकारे लुबाडता येईल त्याच्यासाठी कार्यरत आहेत.
पूर्वी ब्रिटिश राजवटीत जे कुणी ब्रिटिशांच्या पुढे पुढे करायचे त्यांना ब्रिटिश खुश करत असत आणि एखादे पद देऊन किंवा पैशांची लालच देऊन वापर करून घेत असत आणि मग तेच चापलुसी करणारे ब्रिटिशांच्या नावाचा वापर करून आपल्याच बंधू भावांना त्रास देत असायचे.आताही असेच चालते
जो कोणी वरच्या लेव्हलच्या व्यक्तीशी जास्त जवळीक ठेवतो तो पुढे जाऊन त्या गावाचा एखादा पद सांभाळतो किंवा नगरसेवक होतो.पण हे विसरू नका ब्रिटिश हे फक्त आपले काम पुरे होण्याकरिता वापर करीत होते आणि आत्ताचे हे वरच्या लेव्हलचे लोकही तेच करीत आहेत.आपण 75 वर्षे झाली रोजी स्वतंत्र्य मिळून म्हणून आनंद उत्सव साजरा करतोय पण विचार करा आपण खरंच कुठल्या बाजूने स्वातंत्र्य आहोत का.
#yqtaai #स्वातंत्र्यदिन #१५अगस्त #माझादेश #भारतीय #देशाभिमान #bestofyqmarathiquotes