अ आ इ पासून A B C D पर्यंत शिकवले ज्यांनी मला शतशः अभिवादन करते त्या शिक्षकांच्या कार्याला... ज्ञानाची मशाल घरोघरी पेटवून उजेड त्यांनी केला अंधारकडून प्रकाशाकडे जा असा संदेश दिला... अज्ञान रुपी अंधारातून बाहेर त्यांनी काढले... विद्यार्थ्यांचे सुप्त गुण त्यांनी बरोबर ओळखले विद्यार्थ्यांच्या भविष्याला त्यांनी दिला आकार मुलांनी सुद्धा केले शिक्षकांचे स्वप्न साकार विद्या दाना साठी ज्यांनी आयुष्य केले समर्पित त्या सर्व शिक्षकांना करते माझी कविता अर्पित पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान शिकवले आजूबाजूचे जग स्वतःच्या अनुभवातून दाखवले कायम घेण्यापेक्षा देणे महत्त्वाचे हा मंत्र सांगितला हा ज्ञानाचा झरा माणसांच्या मनातून वाहता केला सर्वगुण संपन्न आचरण ठेवावे हीच असते शिक्षकांची इच्छा खऱ्याअर्थाने ह्याच ठरतील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा शिक्षक दिन विशेष