#संपली काळोखी निशा.... मालवले दिवे चांदण्यांचे संपली काळोखी निशा दिनकराच्या आगमनाने उजळल्या दाही दिशा किलबिलाट करती वृक्षांवर पक्ष्यांचा बघा तो थवा मोरपिसारा स्पर्शती तनमनास शुद्ध हवा वसुंधरेच्या मुखकमली उमलली तेजस्वरूप लाली सोनेरी किरणांनी सजून चैतन्याची प्रभात आली उठा उठा सकलांनो प्रभा आली दारी नवे संकल्प नव्या स्वप्नांना देण्या मनास उभारी.. @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #संपली_काळोखी_निशा