Nojoto: Largest Storytelling Platform

*मंद प्रकाश काजव्याचा* *जसा सुखावे नेत्राला* *झगमग

*मंद प्रकाश काजव्याचा*
*जसा सुखावे नेत्राला*
*झगमगाट मग हवा कशाला*
*पांघरू द्या मजं कोशाला*

*अनोळख्या गर्दीत इथल्या*
*कोण मला का ओळखतो?*
*नव्या गड्याचे नवे राज्य हे*
*मीच जुनां का वावरतो?*

*नवं आवृत्ती नवेपणाची*
*मिरवीत जाई जो- तो आता*
*वेळ नसे ना क्षणिक कुणाला*
*गिरविण्या आठवांचा कित्ता*

*चमकणारे किती हिरे*
*पैलू वाचून विझून गेले*
*खुशमस्करे टेंभे मात्र*
*मिरवत मिरवत नाचत आले*

*सूर्य कधी ना कुणा सांगतो*
*प्रकाश माझा प्रखर किती*
*कर्तृत्वाचे तेज उजळता*
*दश दिशां त्या दिपताती*

©Shankar Kamble #कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध 

#Glow
*मंद प्रकाश काजव्याचा*
*जसा सुखावे नेत्राला*
*झगमगाट मग हवा कशाला*
*पांघरू द्या मजं कोशाला*

*अनोळख्या गर्दीत इथल्या*
*कोण मला का ओळखतो?*
*नव्या गड्याचे नवे राज्य हे*
*मीच जुनां का वावरतो?*

*नवं आवृत्ती नवेपणाची*
*मिरवीत जाई जो- तो आता*
*वेळ नसे ना क्षणिक कुणाला*
*गिरविण्या आठवांचा कित्ता*

*चमकणारे किती हिरे*
*पैलू वाचून विझून गेले*
*खुशमस्करे टेंभे मात्र*
*मिरवत मिरवत नाचत आले*

*सूर्य कधी ना कुणा सांगतो*
*प्रकाश माझा प्रखर किती*
*कर्तृत्वाचे तेज उजळता*
*दश दिशां त्या दिपताती*

©Shankar Kamble #कोश #झगमगाट #प्रसिध्दी #दुर्लक्षित #एकाकी #बंध 

#Glow