आज पुन्हा एकदा माझ्या स्वप्नांची गोधडी, मी गुंडाळून ठेवली उद्याच्या आशेवरती ... उद्या पुन्हा एकदा अंथरीन तिला, नवी छोटी स्वप्न माझी जोडून ठेवीन तिला, परत एकदा तिच्यावर लोळून घेईन मनसोक्त... नाहीच झाली काही स्वप्न पूर्ण उद्याही, तर ठेवीन पुन्हा गुंडाळून परत एकदा उद्याच्या आशेवरती ... -वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #आशावादी #आशा #स्वप्न #अधुरीस्वप्न #गोधडी