Nojoto: Largest Storytelling Platform

"...निराशा..." उशाशी यावा चंद्र माझ्या,

"...निराशा..."

उशाशी यावा चंद्र माझ्या,
                        रात्र एवढी न स्नेही झाली!
फुलातून उगावा चंद्र गोड
                      उषा न अजून अशी आली!

खिन्नता मनाची अंतराळात,
                  जाऊनिया एकटी भटकते!
लोचणात आलेले....पाणी,
                पहाटेस दव होऊनिया येते!

नेत्रपल्लवी उमगावी अशी,
                         उलगडले काय कधी निशा?
मजला ठाव एवढेच परी ते
                     तमात लपून असते निराशा
                                    -अशुनुराग #ratr
"...निराशा..."

उशाशी यावा चंद्र माझ्या,
                        रात्र एवढी न स्नेही झाली!
फुलातून उगावा चंद्र गोड
                      उषा न अजून अशी आली!

खिन्नता मनाची अंतराळात,
                  जाऊनिया एकटी भटकते!
लोचणात आलेले....पाणी,
                पहाटेस दव होऊनिया येते!

नेत्रपल्लवी उमगावी अशी,
                         उलगडले काय कधी निशा?
मजला ठाव एवढेच परी ते
                     तमात लपून असते निराशा
                                    -अशुनुराग #ratr