प्रीत तुझी रोज सकाळी कुशीत माझ्या, चांदण्या रुपाची तू दिसावी स्वप्नात टप टप नाऱ्या केसांनी ओल्या, ह्रदयी अलवार छेडली प्रित मनात ||१|| आरसा बिलोरी लाजला पाहून, मृगनयनी, तारूण्य कलिका दिसता मी तर भोळा श्वास रोखून असा , रोमांचित झालो खळी गालावर उमटता ||२|| शिल्प सुरेख आखीव रेखीव, प्रेमात पडला असावा कलाकार सुध्दा अवखळ जल हे उधळीत लाटा मोहात झिजला कठीण कातळ सुध्दा ||३|| आला लहरत एक चावट भुंगा कळ दाटून थरथरली नवथर काया केसांत माळता गजरा होई सुगंधी प्रित तुझी बावरी लावी जीवाला माया ||४|| मी प्रेमात गहीऱ्या आकंठ बुडालो शब्द मधाळ होऊन कवितेत सांडलो स्वप्न ते विरून गेले हवेत धुक्या सारखे तरी रोज पहाटे नव्याने तुझ्यावर भाळलो ||५|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #prittuzi #Mic