खुशाल त्यांनी वार करावे झेलाया मी आहे तत्पर आभाळाची तमा कशाला पंखच माझे देती उत्तर.. अस्तित्वाची तुझी लढाई जुनाच कित्ता युगायुगांचा काळ्या खडकांच्या छातीवर विजय पताका अंकुराचा.. आव्हानांना कोळून प्यालो फेकून अस्तर जुने पुराणे कोश विणले लख्ख प्रकाशी नको आळवू सांज तराणे.. धुळीत माखून गेल्या वाटा जायबंदी पाय कधीचे उरांत धडकी भरते तेंव्हा काठ सोडते पाट नदीचे.. श्वास मोजूनी दिले आजवर उसने होते हसणे– रडणे दोर नाचवी जसा बाहुली जगणे केवळ केविलवाणे.. वाटा माझ्या जरी रोखल्या झेप कोण रोखणार आहे? मला खुणावे क्षितिज मोकळे डोह मनाचे भरून वाहे.. ©Shankar Kamble #cloud #पंख #आभाळ #भरारी #संघर्ष #संघर्षाची_तयारी_करा #लढा #टक्कर