हळूच रात्री कानी एक काजवा काही सांगून गेला तुझा म्हणता म्हणता तो तुझा नाही राहिला... नको उघडू ती मनाची कवाडं जी केव्हाच बंद केलीस नको विसरू तो क्षण , जेव्हा तू एकटीच रडत राहिलीस... एकटेपणाचा भास होता आठवणी त्याच्या रोज कुरवाळत राहिलीस... पुन्हा पुन्हा वेड्या सारखी तेच पुस्तक वाचत राहिलीस, कहाणीचा अंत माहीत असताना सुद्धा तेच धडे गिरवत राहिलीस... अचानक तो काजवा बोलेनासा झाला कदाचित माझ्या अबोल्याने, त्याचे उत्तर मिळाले असेल त्याला... खिडकी तून डोकावता तो दूर उडताना पहिला खूप काही सांगून गेला समज दिली मला... पण तरीही, मनाचा कोपरा मात्र त्याच्यासाठी हळवाच राहिला... #nightfeelings #yqdidi #fireflystory