स्कंदमाता स्तुती ममतामयी जगदंबा पुत्र तुझा सेनापती l त्याची तू कार्तिकेय माता तूच स्कंदमाता आदिशक्ती ll१ll चतुर्भुज धारिणी निर्भया सिंह तुझे वाहन l पद्मासना देवी तू भक्ता शक्ती देई संचालन ll२ll बालक स्कंद एका हातात कमल पुष्प दोन हाती l एका हस्ते वरद मुद्रा तव कृपा देई शुभदा शांती ll३ll शृंगार तुला अति प्रिय हिरवा चुडा आवडतो l पिवळ्या वस्तू प्रिय तुला साज तुला शोभतो ll४ll शुभ्र तुझे वर्ण नयन तुझे लोभस l सूर्य मंडल अधिष्ठात्री देवी तू अलौकिक आणि तेजस ll५ll तुझ्याच कृपेने कालिदासाने रचले रघुवंशम् महाकाव्य l मेघदूत रचना साकार कृपादृष्टी तुझी ग भव्य ll६ll ✍️ प्रियंका सोनवणे