Nojoto: Largest Storytelling Platform

मनी उठलेल्या वादळाला कुठेतरी थांबवु दे. मला तुझ्या

मनी उठलेल्या वादळाला कुठेतरी थांबवु दे.
मला तुझ्यासोबत तुझी होऊन राहु दे |

तुझा हात-हाती धरून लांब कुठेतरी जाऊ दे , 
तुझ्या मिठीत मला काही क्षण घालवु दे |

बंधन न पाळता कसले तुझ्यात जगु दे,
अरे वेड्या मी तुझी सखी न,
मला तर तुझा आनंद तर होऊ दे |

माझा समुद्र तुच, तुझी बेधुंद लाट मला होऊ दे.
तुझ्या मनीचा किनारा म्हणुन तुझ्या प्रेमात राहु दे |

निशब्द तु असा, तुझे बोलके शब्द मला होऊ दे.
तुझ्या आयुष्यातली एक मैत्रीण म्हणुन....
मला तुझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण होऊ दे |

मिटु दे मनीचे अंतर हे असले तुझे नि माझे,
तु माझा नि मी तुझे, हे बंध प्रितीचे जुळू दे.
ह्या सुखाच्या किनारी मला तुझ्यात लुप्त होऊ दे |
 
ह्या मिठीत तुझ्या मला सर्व काही विसरु दे.
मी वेडी तुझी राधा , तुझ्या बासरीची मधुर धुन मला होऊ दे |

           :                                               -शब्दप्रेमवेडी.. #Thetruepoeticsoul...💖