मनी उठलेल्या वादळाला कुठेतरी थांबवु दे. मला तुझ्यासोबत तुझी होऊन राहु दे | तुझा हात-हाती धरून लांब कुठेतरी जाऊ दे , तुझ्या मिठीत मला काही क्षण घालवु दे | बंधन न पाळता कसले तुझ्यात जगु दे, अरे वेड्या मी तुझी सखी न, मला तर तुझा आनंद तर होऊ दे | माझा समुद्र तुच, तुझी बेधुंद लाट मला होऊ दे. तुझ्या मनीचा किनारा म्हणुन तुझ्या प्रेमात राहु दे | निशब्द तु असा, तुझे बोलके शब्द मला होऊ दे. तुझ्या आयुष्यातली एक मैत्रीण म्हणुन.... मला तुझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण होऊ दे | मिटु दे मनीचे अंतर हे असले तुझे नि माझे, तु माझा नि मी तुझे, हे बंध प्रितीचे जुळू दे. ह्या सुखाच्या किनारी मला तुझ्यात लुप्त होऊ दे | ह्या मिठीत तुझ्या मला सर्व काही विसरु दे. मी वेडी तुझी राधा , तुझ्या बासरीची मधुर धुन मला होऊ दे | : -शब्दप्रेमवेडी.. #Thetruepoeticsoul...💖