Nojoto: Largest Storytelling Platform

व्रत..तुझ्यासाठीचं श्रृंगार केल्याशिवायही मी तुल

व्रत..तुझ्यासाठीचं


श्रृंगार केल्याशिवायही मी तुला आवडते... 
पण मला आवडते तुझ्यासाठी सजणे... 
आठवून तुझं प्रेम कधी कधी ऊर भरून येतो
तू माझा म्हणून अभिमान वाटतो...

असेल जर पुनर्जन्म तर मी तुझीच होईन...
प्रत्येक जन्म तुझ्यासाठी घेईन 
माहीत आहे व्रताने काही आयुष्य वाढत नाही
तरीही व्रत हे निमित्त असतं बाकी काही नाही...

त्यात लपलेलंं प्रेम असते, जन्मजन्मांची प्रित असते...! #पौर्णिमा #व्रत
व्रत..तुझ्यासाठीचं


श्रृंगार केल्याशिवायही मी तुला आवडते... 
पण मला आवडते तुझ्यासाठी सजणे... 
आठवून तुझं प्रेम कधी कधी ऊर भरून येतो
तू माझा म्हणून अभिमान वाटतो...

असेल जर पुनर्जन्म तर मी तुझीच होईन...
प्रत्येक जन्म तुझ्यासाठी घेईन 
माहीत आहे व्रताने काही आयुष्य वाढत नाही
तरीही व्रत हे निमित्त असतं बाकी काही नाही...

त्यात लपलेलंं प्रेम असते, जन्मजन्मांची प्रित असते...! #पौर्णिमा #व्रत