#OpenPoetry माझे मत -- माझे विचार. मित्रांनो, मोदी सरकारने क.३७० रद्दकरून तेथे केंद्रशासित सत्ता प्रस्थापित केलेली आहे.काश्मीरमधील क.३७० प्रमाणे-- क.३७१( ए) नागालॅंड ; क.३७१( बी) आसाम ; क.३७१( सी ) मणिपूर ; क.३७१( एफ) सिक्किम ; क. ३७१( जी) अरुणाचल प्रदेश ही कलमे देखील क.३७० प्रमाणे आहेत.समान न्यायतत्वावर ही कलमे देखील रद्द होणे आवश्यक आहे. तेथे देखील इतर राज्यातील लोक जमीनी खरेदी करू शकत नाहीत.एवढेच काय- मोदी सरकारचा गोवंश हत्या कायदा सर्वत्र देशभर लागू असून, आसाम, नागालॅंड,..येथे लागू होऊ शकला नाही आणि विशेष म्हणजे नागालॅंडने भारताचा राष्ट्रीय ध्वज नाकारून ,स्वत: चा वैगळा ध्वज असणेबाबतचा कायदा पारीत केला आहे.याबाबत देशवासीयांनी योग्य काय ते आत्मपरीक्षण करून ठरवावे. अॅड.के.एम.सूर्यवंशी