Nojoto: Largest Storytelling Platform

अकल्पित मागच्या पावसात बरसल्या धारा मला चिंब भिज

अकल्पित

मागच्या पावसात बरसल्या धारा 
मला चिंब भिजवत होत्या ...
त्यावेळी तू सोबत नव्हतास 
मी एकटीनेच भिजून घेतलं तुला आठवत...

यावेळी ही बरसतील पाऊसधारा
तू नसशील सोबत ...आता ही...
मग तेच करीन पुन्हा त्यात भिजून घेईन...
ओसरता टिपूस बरसून जाईल ...
तुला आठवत...यावेळी ही पावसात 

सारे कसे अकल्पित घडले
भेट काय झाली अन् 
दुरावा ही झाला...
भावनांचे नाते आपले 
दूरवर निघूनही गेले....
ते संपले नाही ...
काही क्षण त्यातील थेंब बनूनी ओसरून गेले 
तर , काही ह्रदयात मुरले ...सारे कसे अकल्पित घडले

*सौ.शितल संखे* कविता
अकल्पित

मागच्या पावसात बरसल्या धारा 
मला चिंब भिजवत होत्या ...
त्यावेळी तू सोबत नव्हतास 
मी एकटीनेच भिजून घेतलं तुला आठवत...

यावेळी ही बरसतील पाऊसधारा
तू नसशील सोबत ...आता ही...
मग तेच करीन पुन्हा त्यात भिजून घेईन...
ओसरता टिपूस बरसून जाईल ...
तुला आठवत...यावेळी ही पावसात 

सारे कसे अकल्पित घडले
भेट काय झाली अन् 
दुरावा ही झाला...
भावनांचे नाते आपले 
दूरवर निघूनही गेले....
ते संपले नाही ...
काही क्षण त्यातील थेंब बनूनी ओसरून गेले 
तर , काही ह्रदयात मुरले ...सारे कसे अकल्पित घडले

*सौ.शितल संखे* कविता