चंद्र साक्षी मानून आजवर, मोक्ष कुणा मिळाला स्वयंप्रकाशी असून भास्कर, चंद्राचाच का लळा तमोहारी शशी निरागस, अर्का अपरोक्ष निरहंकारी नक्षत्रेश राजस, तमास प्राश तप्त भू वा संतप्त रुह, शमवी सोम शितल स्पर्श चांदण्यांच्या मैफिलीत तोच सुधाकर सहस्राक्ष तीच मैफिल पाहुणी धरेवर, जीवश्च जिव्हाळा म्हणोनी साक्षी चंद्र चांदण्या, कंठश्च लळा सांजप्रवासात जरी असे तिमीर विदारक भय सांगण्या विधु सोबती सखा पथदर्शक चकवा उरी, अंबका अंधारी, तेजोमय दिसे शशांक चंद्रप्रकाशात पायघड्या अन पायवाटा जणू कौमुदी मंचक उमगले पौर्णिमेस, चंद्र चंद्रिकेचा कोजागिरी सोहळा कलेकलेने कोर वर्धित, पूर्णत्व घेई हिमांशू सावळा #rayofhope #poem #kojagiri #chandra_aahe_sakshila #sanjbhul #fullmoon #supermoon #beautyofthenature 🌕🤍