परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो, आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो, परका ही त्याच्यासाठी रडत होता. फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर, पण आज नवे कपडे परिधान होणार होते. चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला, आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते. जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला, आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते. परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते, कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. ©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो, आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,