लहान असल्यापासून एक बिनकमानीची वस्ती माझ्यासाठी बंद होती… कसलंच दार नव्हतं त्याला पण #संस्काराचं कुलूप मी तोडू शकलो नाही… आईकडे पाहून-पाहून त्या वस्तीला बघून शिव्या देणं हे पुण्य असल्याचा साक्षात्कार झाला… अन मग मी पण #शब्द-सुमने उधळू लागलो… राग यायचा त्या वस्तीचा… कारण नव्हतं माहीत… फक्त एकच सांगितलेलं #घाण आहे ती समाजाची… आणि मी मोठा झालो...माझा मोठा झाला… कळू लागलं त्या वस्तीचं गुम नाम दार अन अस्तित्वाचं कुलूप… किळस येऊ लागली… स्वतःची नाही...त्या वस्तीची… पैश्यांसाठी विकलेले देह पाहत होतो… अन येणाऱ्या साहेबांचा रुबाब-डौल… रात्री तिला मी अजून एका नवीन साहेबासोबत पाहिलं… दररोज नव्याने कशी तयार होत असेल..?? हाच प्रश्न… पण कुलूप लावलेले आपण… बंदीस्त असल्याने संस्कारी ... रात्र झाली… पाऊस सुरू झाला… माझा #ताठ मी रात्रीच शमवला… चार भिंतीत… पैसे न देता…