कोण म्हणतंय संपला आहेस तू उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता' आहेस तू यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावजावर झडप घालणारा 'ढाण्या वाघ' आहेस तू वेळ पडली तर जिंकण्यासाठी चक्रव्यूह रचणारा 'गुरु द्रोण' आहेस तू अजूनही बोथट झाली नाही धार तुझ्या तलवारीची 'फिनीशरचा' चाबूक फिरवून तोंडे बंद केली टीकाकारांची तू विझला नाही श्रेष्ठत्वाचा अंगार अजूनही