_#कवी'धनूज. हो माहितीये.. हो माहितीये तूच बोलली होतीस नाही करत मी प्रेम तुझ्यावर । मग आज का भेटू वाटले तुला मग आज का भेटू वाटले तुला त्याच बस'स्टाँपच्या बाकावर । ज्या बाकावर.. तूटून गेले होते काळे'मनी प्रेमसूत्राचे, तुझ्या नावाचा तो टाहो आजहि धडधडतो ह्रदयावर । मी विसरलोय आता तू हि विसरुनिया जा मी विसरलोय आता तू हि विसरुनिया जा गोंदन तुझ्या नावाच मी केंव्हाचच जाळलंय छातीवर । प्रेम तुझ भाकित सारं प्रेम तुझ भाकित सारं फसव्या जगाच हे साधन मी आज हि सहतो गोंदनाचा प्रेमवेडा तुझा डाग छातीवर । प्रेमवेडा तुझा डाग छातीवर । -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. #प्रेमवेडा डाग छातीवर