आजही फक्त जिवंत आहे, नेमकी त्याचीच खंत आहे. निखळले सोबतीचे सगळेच तारे, गर्वात अजुनी आसमंत आहे. किनारीच फक्त फेसाळतो दर्या, गर्भात तो हि किती शांत आहे. न उलगडे कधी विरहाचे गूढ, दर्प तुझा हल्ली साऱ्यांत आहे. का नेंहमीच चूक वाऱ्याची असावी, तो एकच तर स्पर्श शहाऱ्यात आहे. कसे जुळावे धावत्या पावलांशी, आपले जगणे निवांत आहे. खायला उठते रिकामे घर माझे, तुझी आठवण पसाऱ्यात आहे. टाळतो हल्ली मी लिहिण्याचा मोह, तुझे अस्तित्व माझ्या गझलांत आहे. #सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekaavish3