बोलणे तुझे प्रिये, जसे मंजुळ संगीत ऐकत रहावे असे शोधूनी एकांत... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या दिवसाची सुरुवात अलंकारानी करुयात. अलंकाराचा पहिला प्रकार उपमा याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार . अलंकारांचे प्रकार:- १) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो." या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते.