जिवाचं रान केलं देहाचं भान गेलं तरी नाही अंगाला सोनकळी आजचा दिस माझा मी बळीराजा माझं शेत माझा बळी कष्टाचं पाणी व्हायल पाण्यापरी रगात झालं तरी नाही मनगटाला सोनवाळी आजचा दिस माझा मी बळीराजा माझं शेत माझा बळी भुकेलं पोट मारलं पोटचं होतं पाठी सारलं तरी नाही घास उदराला दोनवेळी आजचा दिस माझा मी बळीराजा माझं शेत माझा बळी #rayofhope #nationalfarmersday #baliraja #Unfairdestinyoffarmers #thankful if u eat today thanks a farmer 👏👏👏❤