लॉकडाऊन मैलो न मैल चालल्यानंतर तो झाडापाशी येऊन थांबतो वदवून घ्या हवं ते साहेब असं त्या कॅमेराला तो म्हणतो झूम करून कॅमेरा पाहत असतो त्याच्या डोळ्यातले थेंब एका वेळची भाकर मिळते बदल्यात त्याला जेमतेम कुठून आलात कुठं चाललात होतो प्रश्नांचा भडिमार बायको पोरं अन गाठोडं एवढंच सोबत संसार दूर असतं गाव अजून पण प्रवास असतो पायी हळू चाला म्हणतो कॅमेरा पण त्यांना असते घाई ना मास्क ना साबण कित्येक दिवस एकच शर्ट बाळ्याही असतो शांत आता एरवी ज्याला तो म्हणायचा कार्ट सारं सारं काही आता कैद केले होते कॅमेरात अजून एक भाकर दिली म्हणत लागेल पुढल्या प्रवासात वाढेल आता टीआरपी म्हणून दादा खुश होता रुबाब त्या दादाचा एकदम कसा पॉश होता परतीच्या प्रवासात मग पोलिसांनी अडवले पास काढायचे विसरला बहुदा मग परत त्याला पाठवले फिरून फिरून दमला आता पैसे होते पण सारेच होते बंद शेवटी तो ही माणूसच मग पोटाला लागले भुकेचे छंद योगायोग म्हणा वा नियतीचा खेळ तेच भेटले कुटुंब पुन्हा ज्याची कॅमेराने मागितली होती वेळ माणूस जरी अबोल त्याने डोळ्यांतून सारे ओळखले आपला तुटका संसार त्याने तिथेच मग टाकले त्याचीच भाकर त्याला देऊन साहेब खाऊन घ्या म्हंटला सकाळ पासून हिंडताय जरा जेवून घ्या म्हंटला आता अश्रू बोलत होते तो नुसता पाहत होता विठ्ठलच की रे समोर माझ्या असा स्वतःला सांगत होता अनेक बातम्या ज्याने आजवर हिट केले होते घरी जाऊन आजचे शूटिंग त्याने गुपचूप डिलिट केले होते त्याने गुपचूप डिलीट केले होते... रचनाकार, ©सुरेश गोविंद पवार #लॉकडाऊन #lockdown