पाखरुच ते, घरट्यात राखिले जे, आज ना उद्या उडायचे होते, विसरलो आपले पाश प्रेमाचे, वेळीच वेगळे तोडायचे होते, गुंतलो त्यात इतुके ऐसे की मनी ओढ फार लागली, भुर्रकन उडून जाता ते ऐसेची, मनी ओढाताण फार झाली, क्षणाक्षणाच्या जोडूनि नाना काड्या, मनामनातून विणल्या चित्त रमाय, भावनांचे किती रेखिले घरटे सुरेख, चित्त पाखरू कधी तेथे स्थिरते काय? #पाखरू #विरह #मराठी #कविता #yq_gns