#हरवलेला बाबा# लेक मी तुझी बाबा घे मला मिठित, मी आलेय या जगात तुला शोधीत. या लेकीचा बाबा हरवलास कुठे तू, येशील ना रे बाबा मला भेटायला तू. जीव तुटला आहे बाबा पहायला तुला, या जन्मी तरी तु भेटशील ना तु मला . नजर ही शोधतेय तुझ्या त्या चेहऱ्याला, रोज विचारत असते मी त्या वाऱ्याला. दिवस रोज जातो पण बाबा नाही दिसत, सुखाच्या त्या क्षणात बाबा नाही मिळत. घरातील लेकरांची नजर तुझी वाट बघतेय, येशील म्हणुन मीच स्वतःला समजावतेय. वाट पाहताना ती वाट मात्र ती संपून गेली, कन्यादानासाठी माय मात्र एकटी राहीली. तुझ्या मिठीतला विसावा क्षणात तो उडाला, माझा तो हरवलेला बाबा दिसेल का जगाला. कु. स्वप्निता कमलाकर आंबेरकर #father