पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा चार दिवसाचाच हा बाजार आहे । पुर अोसरला म्हणे ; डोळ्यात महापूर तसाच आहे । प्रश्न तेच आहेत सोडवणार कोण ? म्हणे आहो; हा चार दिवसांचाच बाजार आहे। पडक्या भिंती लिंपून घ्या म्हणे ;चार दिवसांचाच हा पावसाळा आहे। पुन्हा पूर येणार नाही सरकारचा अंदाज आहे । आता पुर अोसरला म्हणे आश्वासनांचा महापूर आहे। गेलेत सुट्टीवर स्वच्छ भारत अनुयायी म्हणे; तरी फेसबुकवर अपडेट मात्र फोटो त्यांचाच आहे । पाहिले पुरात मी ही सशक्तताना हात धुताना पाहिली मी या डोळ्यांनी अशक्तांना भुके मारताना । खरंच दंड शक्तीला मान आहे शिकवून गेला महापुर आहे। पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा साला ; चार दिवसाचाच बाजार आहे । म्हणे पुन्हा घर उभी राहतील आता पण; कुणाची हा खरा प्रश्न आहे । पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा साला ; चार दिवसाचाच बाजार आहे । राजेश