White झाडे लावुनी जागवूया आपली माती उष्णतेच्या लाटेचे उभे थैमान माथी वर्षानुवर्ष खितपत पडली आपली माती तुटका पाऊस नि दुष्काळ हाती निवारण यावरी एकच आता झाडे लावूनी जगवूया आपली माती ज्या गावात नि शिवारावर झाडे हिरवी गाव आनंदाने ते सदा बहरे करा निश्चय मनात एकच आता नि उतरू द्या आपल्या कृतीत झाड लावुनी जगवूया आपली माती नाही तो दिवस लांब आता कृत्रिम हवा पाणी येईल बाजारी तव महाग होईल जीवनाची स्पंदने का ? संकट ओढवून घेता आपल्या हाताने झाड लावुनी चला जगवूया माती नको उशीर पुन्हा आता तू तू मै मै का करता ? ठरेल प्राणघाती हे आपणा उठा जन सहकार्याने शाश्वत जीवनासाठी झाड लावुनी चला जगवूया आपली माती ©Jaymala Bharkade #झाडे लावा झाडे जगवा