मला तुला काही सांगायचंय, कसं कळेना वेड्या तूच ओळख मनातले, बोल वळेना की गप्प राहू मी अन् तू भावनेचा मीत हो हृदयानी समजून घे मग अंतरंगी संवेदना दिलासा आहेस तू जरी या हृदयाचा राजा स्पर्श तुझा रेशमी, गाली गर्भश्रीमंती बाणा चल स्मिताचे पुंजके होऊ, विरू या ढगात गाऊ मंजुळ गाणी दिलाची, ओघळू चेतना आभा सौंदर्याची मी, तू मुकूट शोभतो बरा चैतन्याचा पेटवू झरा, करू लखलख दिना मित्रानों💕 कसे आहात? मी परत हजर आहे माझ्या रोजच्या वेळेवर तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन. हल्ली आमच्या विषयामुळे तुम्हाला ही प्रेमाचा महिना आलाय अस वाटत असेल,नाही का? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मला तुला काहीतरी सांगायचंय...