Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांचे इमले, बहुत बांधिले, बहू तोषविले , जगतामाज

शब्दांचे इमले, बहुत बांधिले,
बहू तोषविले , जगतामाजी।
तुज पाहिले, मज वाटले,
तोषवावे तुज, शब्दसुमनांनी।
उघडले मुख, तव सन्मुख,
झालो मूक, शब्द संपले।
तू सागर, मी रीती घागर,
तुजसमोर , मी कोण।
शब्दांत न मावे, कोणा न सांगवे,
ऐसा अगम्य ठावे, गुरुमहिमा।
न इच्छा धनाची, न च कौतुक मानाची,
इच्छा तव कृपेची , गुरुराया।
शब्द तुझे, अर्थ तुझे,
सारेच तुझे, मी निमित्तमात्र। #गुरू #गुरुपौर्णिमा #yq_gns
शब्दांचे इमले, बहुत बांधिले,
बहू तोषविले , जगतामाजी।
तुज पाहिले, मज वाटले,
तोषवावे तुज, शब्दसुमनांनी।
उघडले मुख, तव सन्मुख,
झालो मूक, शब्द संपले।
तू सागर, मी रीती घागर,
तुजसमोर , मी कोण।
शब्दांत न मावे, कोणा न सांगवे,
ऐसा अगम्य ठावे, गुरुमहिमा।
न इच्छा धनाची, न च कौतुक मानाची,
इच्छा तव कृपेची , गुरुराया।
शब्द तुझे, अर्थ तुझे,
सारेच तुझे, मी निमित्तमात्र। #गुरू #गुरुपौर्णिमा #yq_gns