#OpenPoetry पाऊस थेंबाने मातीचा सुगंध चहूकडे दरवळवणारा निसर्गाला हिरवळीने बहरवणारा बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा धो धो कोसळणारा खुदकन हसवणारा अंगावर शहारे आणणारा चिंब भिजवणारा चहाचा घोट नवा वाटणारा कांदाभजीला चव देणारा कागदाच्या होडीबरोबर वाहणारा शाळेभोवती तळे साचून सुट्टी देणारा खिडकीतून हळूच खुणावणारा खोटे पैसे घेऊन खरा येणारा सर्वाना हवाहवासा वाटणारा प्रेमाला हाक देणारा ओल्या नजरांना प्रेमात पडणारा एकाच छत्रीत जवळ आणणारा पाऊस .. #OpenPoetry #pahilapaus