जन्म दिवसाची आतुरतेने वाट बघणारे आपण कायमच खूप आनंदात असतो,यात नवल ते काय मित्रांनो? सर्व गोष्टी मनापासून सुखावणाऱ्या असतात,आपल्याला मोठे पंख मिळणार आहेत, आपण आता जबाबदार होणार आहोत,याची जाणीव ते प्रत्येक वाढते वर्ष करून देते. पण मला जन्म देणारे आई वडील मात्र माझ्या जन्माच्या वाढत्या वयासोबत एका एका वर्षाने वयस्क होत चालले आहे,याची जाणीव देखील सलत राहते. काय आणि कसे थांबवावे आपण आपल्या आई वडिलांना म्हातारे होण्यापासून?? आपण मोठे होतो,अनुभवी होतो पणआपले आधारस्तंभ आपले वटवृक्ष मात्र सुरकुत्या आलेले दिसू लागतात, त्यांच्यातली ऊर्जा कमी झालेली दिसते, वयोमानानुसार ते थकलेले दिसू लागतात! मुलांचे बरे असते कायम आई वडील सोबत असतात त्यांच्या हर एक सुख दुःखात! पण आम्हा मुलींच्या जीवनाला जसा शापच लागला आहे पूर्वापार परंपरा आणि रूढींचा. आपल्या आई वडिलां पासून दूर राहून त्यांच्या म्हातारपणात आधार ही त्या होऊ शकत नाहीत. बोलण्याच्या बाता वेगळ्या असतात पण चालू संसार सोडून त्यांच्याकडे सासू सासऱ्यांसारखे लक्ष नाही देता येत,यापेक्षा वाईट प्रकारचा हतबल पना तो दुसरा काय आहे एका मुलीसाठी?? फक्त पैसे पुरविणे म्हणजे आधार नसतो,मला मायेने त्यांना खाऊ घालायचं आहे अगदी मनापासून त्यांना घड्याळाच्या प्रत्येक काट्यावर साथ द्यायची आहे. त्यांना हर एक देवालयात सोबत दर्शनासाठी न्यायचे आहे, त्यांच्या सोबत त्यांच्या भोवतालच्या वर्तुळात माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे "गणपती बाप्पा सारखी"! एक न विरणार हसू व्हायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरील!! - निशिगंधा✍️🌼 ©Nishigandha Kakade #मनातलं_पानात #माझे_विचार