#विठ्ठल_विठ्ठल आज विठ्ठल उद्या विठ्ठल हरएक क्षणात विठ्ठल विठ्ठल.. जल विठ्ठल स्थल विठ्ठल ह्रदयीचा ध्यास विठ्ठल विठ्ठल.. काळा विठ्ठल गोरा विठ्ठल अवघाची रंग विठ्ठल विठ्ठल.. आई विठ्ठल बाप विठ्ठल प्रत्येक नात्यात विठ्ठल विठ्ठल.. सुखात विठ्ठल दुःखात विठ्ठल समतोल म्हणजे विठ्ठल विठ्ठल.. घरात विठ्ठल दारात विठ्ठल माणुसकीच्या झऱ्यात विठ्ठल विठ्ठल.. यातना विठ्ठल फुंकर विठ्ठल उगवती आशा विठ्ठल विठ्ठल.. होश विठ्ठल बेहोश विठ्ठल कुडीतला प्राण विठ्ठल विठ्ठल.. ज्ञान विठ्ठल विज्ञान विठ्ठल जगण्याचे भान विठ्ठल विठ्ठल.. कळला विठ्ठल उरला विठ्ठल साऱ्यात शोधते विठ्ठल विठ्ठल