आमचा बळीराजा धान पिकवतो गाईगुरं पाळतो दुध पुरवतो भाजीपाला निगुतीने करतो घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो... आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो?? पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या विसरतो... प्रत्येकाने रोज किमान पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" इतके बोलून पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. आणी आभार मानावेत. 🎇 शुभ दिपावली 🪔 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात. हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रमसंवताचा संधीकालातला दिवस. सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषीसंस्कृतीची ही प्रथा होती. मग आजचं कोलँब आपल्या बळीराजासाठी म्हणजेच शेतकरीराजासाठी. #शेतकरी१ टँग करायला विसरु नका. आणि मनातलं लिहा.